हर घर तिरंगा अभियानातील राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक उतरवून घेणे बाबत.
अहमदनगर महानगरपालिका हद्दीत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हे अभियान राबवून 15 ऑगस्ट सुर्यास्तापुर्वी राष्ट्रध्वज उतरविणे आवश्यक होते. परंतु महानगरपालिका हद्दीत आजही राष्ट्रध्वज निदर्शानास येतात. राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान टाळण्यासाठी राष्ट्रध्वज उतरवून जतन करुन ठेवण्याचे आवाहन अहमदनगर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.